ऑनलाईन टीम / बिहार :
बिहारमध्ये दिवसभरात 75 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बिहारमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 60 हजार 794 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कालपासून 118 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर बिहारमधील एकूण 2,59,072 रुग्णांपैकी आता पर्यंत 2 लाख 58 हजार 136 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात रुग बरे होण्याचे प्रमाण 98.98 % आहे. तर आतापर्यंत 1,503 कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, बिहारमध्ये आतापर्यंत जवळपास 2 कोटी 10 लाख 86 हजार 973 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 1 हजार 154 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.