ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहार विधानसभा निवडणुकीच्या 243 जागांसाठी आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. प्रारंभिक कल सकाळी 9 वाजल्यापासून हाती येण्यास सुरूवात होईल.
मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने बिहारमधील 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्रे स्थापन केली आहेत. बिहार राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, तीन नालंदा, बांका, पुरिया, भागलपूर, दरभंगा, गोपालगंज, सहारसा, सिवान, बेगुसराय आणि गया या तीन ठिकाणी दोन मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. 55 मतमोजणी केंद्रांवर 414 सभागृहे बांधण्यात आली आहेत.
मतमोजणी केंद्रांवर प्रथम टपाली मतपत्रिकांची मोजणी केली जाईल. टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी निवडणूक आयोगाने अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी तैनात केले आहेत.