ऑनलाईन टीम / पटना :
माजी डिजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर आज दुपारी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला.
पांडे यांनी शनिवारी संयुक्त जनता दलाच्या (यू) कार्यालयाला भेट दिली. तिथे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी त्यांची पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा झाली होती. त्यानंतर आज त्यांनी पक्षात अधिकृत प्रवेश केला. बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून, त्यांना वाल्मिकी नगरमधून पोटनिवडणूक लढवण्याची संधी दिली जाऊ शकते.
पांडे हे स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात येणार याची बिहारमध्ये चर्चा होतीच. त्यांच्या समर्थकांकडूनही पांडे निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळाले होते. पांडे यांनीही नितीश कुमार सरकारच्या दारूबंदी, रस्ते आणि विकासाच्या सर्व कामांचे उघडपणे कौतुक केले होते.









