बेंगळूर/प्रतिनिधी
बिहार आणि झारखंडचे माजी राज्यपाल एम. राम जोइस यांचे मंगळवारी बेंगळूर येथे दीर्घ आजाराने निधन झाले, अशी माहिती कौटुंबिक सूत्रांनी दिली आहे.
राम जोइस राज्यसभेचे माजी खासदार होते. तसेच त्यांनी पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले होते, ते वयाशी संबंधित आजारांनी ग्रासले होते.
राम जोइस २७ जुलै १९३२ रोजी शिवमोगा येथे जन्मले होते. त्यांनी बीए आणि लॉची पदवी घेतली होती. ते सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते.