ऑनलाईन टीम
बिहार सर्वात खास आहे. जर तुम्ही मला बिहारमधील निकालाबद्दल विचारलंत तर माझं उत्तरही निकालाप्रमाणे साफ आहे. बिहारमधील यशाचं रहस्य सांगायचं झालं तर हा ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्राचा विजय झाला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. बिहारमध्ये सत्य जिंकलं आहे, बिहारमध्ये विश्वास जिंकला आहे. तरुण, गरीब जिंकला आहे, शेतकरी जिंकला असल्याचेही मोदी म्हणाले. दिल्लीमधील कार्यालयात विजयाचे सेलिब्रेशन करत असताना ते बोलत होते.
“देशाच्या विकासाचं काम करेलं त्यालाच सेवा करण्याची संधी मिळेल हे देशवासियांनी सांगितलं आहे. “देशाचा आणि राज्याचा विकास हाच निवडणुकीचा मुख्य आधार असून भविष्यातही राहणार आहे. ज्या लोकांना अद्यापही हे कळलं नाही त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे,” असा टोलाही नरेंद्र मोदींनी यावेळी लगावला.
बिहारमधील निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले. या यशाचं भाजपाकडून जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. दिल्लीमधील कार्यालयात सेलिब्रेशन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली. यावेळी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंहदेखील उपस्थित हाेते. बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून १२५ जागांवर विजय मिळाला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









