ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहारमध्ये मागील चोवीस तासात लखीसराय, गया, बांका, जमुई, समस्तीपुर, वैशाली, नालंदा आणि भोजपुर जिल्ह्यात वीज कोसळल्याने 21 लोकांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती शनिवारी बिहार आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

दरम्यान, बिहारमध्ये पावसाळ्यात वीज पडून होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. याआधी गुरुवारी म्हणजेच 2 जुलै रोजी वीज कोसळून 22 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत देण्याची घोषणा देखील केली होती.









