ऑनलाईन टीम / सीवान :
बिहारच्या सीवान जिल्ह्यातील अंगया गावात भाजप आणि राष्ट्रीय जनता दलाच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. हाणामारीत राजदचे काही समर्थक जखमी झाले असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अंगया गावातील काही दलित आणि कुशवाहा कुटुंबियांनी आपल्या घरावर राजदचा झेंडा लावला होता. त्यावरून भाजपचे समर्थक नाराज होते. दरम्यान, सीवानच्या गोरेयाकोटी विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार देवेशकांत विजयी झाल्यानंतर भाजप समर्थकांनी घरावर राजदचा झेंडा लावल्यावरून राजदच्या नित्यानंद सिंह यांच्यासह 14 जणांना गंभीर मारहाण केली.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या समर्थकांना सीवान येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाणप्रकरणी राजदच्या कार्यकर्त्यांनी सीवान पोलिसात तक्रार दिली आहे.









