ऑनलाइन टीम / पाटणा :
केंद्र सरकारने आणलेल्या नव्या नागरिकत्व संशोधन कायद्या आणि एनआरसीबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, बिहारमध्ये हे दोन्ही कायदे लागू करण्यात येणार नाहीत.
दरम्यान, बिहारमध्ये विधानसभेबाहेर राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांनी नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात जोरदार आंदोलन केले. बिहारमध्ये सीएए-एनआरसी लागू होणार नाही, अशी मागणी यावेळी आमदारांनी केली त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नितीश कुमार म्हणाले, बिहारमध्ये एनआरसी लागू करण्याचा प्रश्नच येत नाही. हा केवळ आसाम संदर्भातील मुद्दा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे हे बिहारमध्ये लागू होणार नाही, असे नितीश कुमार म्हणाले.