ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहार राज्यातील नितीश कुमार यांच्या सरकारमधील आणखी एका मंत्र्याचे कोरोनामुळे निधन झाले आहे. जनता दलाचे वरिष्ठ नेते आणि बिहार पंचायती राज्य मंत्री कपिल देव कामत यांचे शुक्रवारी कोरोनामुळे निधन झाले. ते 69 वर्षांचे होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा येथील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर मागील एका आठवड्यापासून उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शोक व्यक्त केला आहे.
कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वी पासून कपिल देव कामत हे किडणीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना सारखे डायलिसिस देखील करावे लागत असे. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारा दरम्यान, त्यांनी अंतिम श्वास घेतला.
कपिल देव कामत हे 10 वर्ष मंत्री होते. जनता दल मधून ते गेली 40 वर्षे राजकारणात होते. ते एक चांगले नेते होते. त्यांचा पक्षाला मोठा आधार होता. ते एक लोकप्रिय नेता होते. त्यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे तसेच त्यांच्या निधनामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, संध्या बिहारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून बाधित रुग्णांच्या संख्येने 2 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर आतापर्यंत 1,88,802 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 972 जणांनी आपला जीव गमावला आहे.









