देशातील एक महत्त्वपूर्ण राज्य असलेल्या बिहारमधील निवडणुका होत असतानाच मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार उलथवून सत्तेवर आलेल्या शिवराजसिंह चौहान सरकारच्या स्थैर्यावर शिक्कमोर्तब करणाऱया 28 जागांवर तीन नोव्हेंबरला पोटनिवडणुका होत आहेत. हा भाग काँग्रेसमधून फुटून भाजपावासी झालेल्या आणि सध्या भाजपचे राज्यसभा खासदार असलेल्या ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या प्रभावाखालील असल्याने शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारच्या भवितव्याबरोबरच सिंदिया यांचीही प्रति÷ा पणाला लागली आहे. बिहारमधील आधी सोपी वाटत असलेली निवडणूक नितीशकुमारांच्या दृष्टीने अवघड होत जात असतानाच शिवराजसिंह चौहानांना मात्र अवघड वाटत असलेली ही मोठी पोटनिवडणूक सोपी होत चालली आहे.
मध्य प्रदेशच्या विधानसभेतील 230 पैकी 29 जागा रिक्त असून या रिक्त जागांपैकी 28 जागांसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. सध्या विधानसभेत असलेल्या 201 आमदारांपैकी 107 जणांचे समर्थन भाजपकडे असून काँग्रेसचे विधानसभेत 89 आमदार आहेत. सत्ता परत मिळवण्यासाठी काँग्रेसला पोटनिवडणुकीत जवळपास सर्व जागा जिंकाव्या लागतील. याउलट भाजपने किमान 9 जागांवर विजय मिळवला तरी बहुमत राखणे शक्मय होणार आहे. मध्य प्रदेशमधे काँग्रेस भाजपाच्या तोडीस तोड शक्तिशाली असल्याने भाजपसाठी ही निवडणूक खरे तर सोपी नव्हती. पण घटनाच अशा घडत आहेत किंवा काँग्रेसकडूनच होत आहेत, त्यामुळे भाजपला मैदान मारणे सोपे झाले आहे.
नुकतेच एका प्रचारसभेत बोलताना मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांची जीभ घसरली. त्यांच्याच मंत्रिमंडळात पूर्वी मंत्री राहिलेल्या व राजीनामा देऊन आता शिवराजसिंह चौहान मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असलेल्या रमा देवी या दलित महिलेला ‘आयटेम’ संबोधून महिलांचा, त्या शेतकऱयाची मुलगी असल्याने शेतकऱयांचा व दलितांचाही अपमान केला गेला.
मध्य प्रदेशच्या डबरा येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाषणा दरम्यान म्हटले की, ‘सुरेंद्र राजेश आपले उमेदवार आहेत, साध्या-सरळ स्वभावाचे आहेत. हे तिच्यासारखे नाहीत. काय नाव तिचं? मी काय तिचे नाव घेऊ? तुम्ही तर तिला माझ्यापेक्षाही चांगल्याप्रकारे ओळखतात, तुम्ही तर मला अगोदरच सावध करायला हवं होतं, ‘ही काय आयटम आहे?’.’’
यावर राज्यभर भाजपाने आंदोलन केले, शिवराजसिंह चौहान तर काही मंत्र्यांसह दोन तास मौन पाळत आंदोलनाला बसले. कमलनाथ यांच्या विरोधात निवडणूक आयोगाला तक्रार करण्यात आली. आयोगानेही स्पष्टीकरण मागितले आहे व आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले असल्याचे स्पष्ट केले.
महिला आयोगानेही कमलनाथ यांना नोटीस पाठवली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी कमलनाथ यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असून माफी मागण्याची अपेक्षा व्यक्त करूनही कमलनाथ माफी मागण्यास तयार नाहीत. उलट आयटेम म्हणजे एखाद्या लेखातील मुद्यांना जसे आयटेम क्रमांक असतात तशा अर्थाने मी आयटेम हा शब्द वापरला होता असे न पटणारे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. अर्थात सध्या पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत अशा शक्तिशाली नेत्यांसमोर जसे काँग्रेस हायकमांडचे फारसे काही चालत नाही तशीच परिस्थिती कमलनाथ यांच्याबाबतीतही असल्याने पक्ष पातळीवर काहीही कारवाई अपेक्षित नाही.
इमरती देवी, त्या माजी आमदारांपैकी एक आहे ज्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता. इमरती देवी या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कट्टर समर्थक असून त्या ज्योतिरादित्यना आपले राजकीय गुरु मानतात. ज्योतिरादित्य शिंदे व इतर आमदार असे 25 जण फुटल्याने कमलनाथांची सत्ता गेली होती. त्यातील इमरती देवी एक असल्याने कमलनाथ यांचा त्यांच्यावर राग असला तरी अशा प्रकारची उथळ टीका कॅबिनेट मंत्री असलेल्या दलित महिलेवर केल्याने त्याचा राजकीय फटका महत्त्वाच्या असलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला बसल्याशिवाय राहणार नाही.
अशातच 25 आमदारांच्या राजीनाम्यामुळे सत्ता गमावलेल्या काँग्रेसला पुन्हा राजीनाम्याचा धक्का सहन करण्याची वेळ आली. यावेळी काँग्रेसचे आमदार राहुलसिंह लोधींनी राजीनामा दिला आहे. आमदार राहुल सिंह लोधी यांनी दोन दिवसांपूर्वी रामेश्वर शर्मा यांची भेट घेऊन राजीनामा देत असल्याचे तोंडी सांगितले होते. शर्मा यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याआधी शांतपणे विचार करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत संपताच आमदार राहुलसिंह लोधी यांनी लेखी स्वरुपात राजीनामा दिला. हा राजीनामा हंगामी विधानसभाध्यक्षांनी मंजूर केला. मध्य प्रदेशमध्ये कोरोना संकटामुळे अद्याप विधानसभाध्यक्षांची निवडणूक झालेली नाही. भाजपचे आमदार असलेल्या रामेश्वर शर्मा यांच्याकडे विधानसभाध्यक्षांचे अधिकार आहेत. राज्यपालांनी शर्मा यांची हंगामी विधानसभाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.
विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा मंजूर केल्यामुळे मध्य प्रदेशमध्ये आणखी एका आमदाराचा मतदारसंघ रिक्त झाला. आता दमोह या मतदारसंघासाठीही पोटनिवडणूक घ्यावी लागेल. आधीच 25 काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यांमुळे काही जागा रिक्त झाल्या असताना रिक्त मतदारसंघांमध्ये आणखी एकाची भर पडली आहे.
राहुलसिंह लोधी पहिल्यांदाच निवडणूक जिंकून आमदार झाले होते. त्यांनी दीड वर्षानंतर काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याआधी गेल्या आठवडय़ात अपक्ष आमदार केदारसिंह दावर यांनीही भाजपला समर्थन जाहीर केले. यामुळेच स्थिर सरकारसाठी मतदार सत्ताधारी भाजपला पाठिंबा देण्याची शक्मयता जास्त असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
आता थोडे मध्य प्रदेशच्या इतिहासात डोकावूयात. 2013 मधे भाजपाने 230 पैकी 165 तर काँग्रेसने केवळ 58 जागा जिंकल्या होत्या. 2018 मधे मात्र भाजपा 109 वर घसरली तर काँग्रेसने 114 वर मजल मारली व छोटय़ा पक्षांच्या मदतीने कमलनाथ यांनी सरकार स्थापन केले. विशेष म्हणजे 2018 मधे काँग्रेसला एकूण 40.90 टक्के म्हणजे 1,55,95,153 मते मिळाली होती, तर भाजपाला 41 टक्के म्हणजे 1,56,42,980 अशी किंचित जास्त मते मिळूनही काँग्रेसपेक्षा 5 जागा कमी मिळाल्या होत्या. भाजपा 10 जागा एक हजारपेक्षा कमी फरकाने हरली होती. भाजपाने थोडा जोर लावला असता व सवर्णांना दिलेले आरक्षण निवडणुकीपूर्वी दिले गेले असते तर भाजपाच्या जागा निश्चितच वाढल्या असत्या व तेवढय़ाच काँग्रेसच्या कमी झाल्या असत्या व सत्ता काँगेसकडे गेली नसती हे वरील आकडेवारीवरून ध्यानात येईल.








