ग्रॅमी पुरस्कारांचे वितरण – बियोन्सेने 28 वा ग्रॅमी पुरस्कार पटकाविला
वृत्तसंस्था / लॉस एंजिलिस
63 व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कारांची घोषणा 14 मार्च (भारतीय प्रमाणवेळेनुसार 15 मार्च) रोजी करण्यात आली आहे. या सोहळय़ात 84 वर्गवारींच्या अंतर्गत सांगितिक कलाकार, गीत आणि अल्बम्सना गौरविण्यात आले आहे. पॉपस्टार बियोन्सेने कारकीर्दीतील 28 वा ग्रॅमी पुरस्कार स्वतःच्या नावावर करत इतिहास रचला आहे. याचबरोबर बियोन्सेने यंदा दोन पुरस्कारांवर स्वतःचे नाव कोरले आहे. तीनवेळा सर्वोत्कृष्ट अल्बमचा पुरस्कार मिळविणारी 31 वर्षीय टेलर स्विफ्ट पहिली गायिका ठरली आहे.

यंदा हा सोहळा लॉस एंजिलिस कन्व्हेंशन सेंटरमध्ये पार पडला आहे. तर सर्वसाधारपणे हा सोहळा स्टेपल्स सेंटरमध्ये आयोजित केला जात असतो.विनोदवीर आणि टॉक शोचे सूत्रसंचालक ट्रेवर नूह यांनी याचे सूत्रसंचालन केले आहे. हा पुरस्कार सोहळा 31 जानेवारी रोजी आयोजित होणार होता, पण कोरोना संकटामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता.
स्विफ्टचा अल्बम फोल्कलोरला यंदाचा सर्वोत्कृष्ट अल्बमचा पुरस्कार मिळाला आहे. तर बियोन्से यांनी एलसिन क्राउन यांचा विक्रम मोडीत काढला आहे. बियोन्सेला ‘ब्लॅक परेड’साठी उत्कृष्ट आर अँड बी परफॉर्मन्स तर ‘ब्राउन स्किन गर्ल’साठी सर्वोत्कृष्ट संगीत व्हिडिओ आणि ‘सॅवेज’साठी उत्कृष्ट रॅप परफॉर्मन्स पुरस्कार मिळाले आहेत.
विजेत्यांची यादी
शेणी विजेता कलाकार/अल्बम
अल्बम ऑफ द ईयर फोकलोर टेलर स्विफ्ट
आर अँड बी परफॉर्मन्स बियोन्से ब्लॅक परेड
पॉप व्होकल अल्बम फ्यूचर नास्टॅल्जिया दुआ लिपा
रॅप साँग सॅवेज बियोन्सेवर चित्रित
साँग ऑफ द ईयर आय कान्ट ब्रीद टिअरा थॉमस
पॉप सोलो परफॉर्मन्स वॉटरमेलन शुगर हॅरी स्टाइल्स
कंट्री अल्बम वाइल्डकार्ड मिरांडा लॅबर्ट
न्यू आर्टिस्ट मेगन स्टॅलियन सॅवेज
रिकॉर्ड ऑफ द ईयर एव्रीथिंग आय वाँटे बिली एलिश
मेलोडिक रॅप परफॉर्मन्स लॉकडाउन एंडरसन पाक
कंट्री साँग क्राउडेड टेबल कार्लिले, हेम्बे
कंट्री डुओ 10,000 ऑवर्स जस्टिस बीबर
कंट्री सोलो परफॉर्मन्स व्हेन माय एमी प्रेज विंस गिल
रॉक अल्बम द न्यू एब्नॉर्मल द स्ट्रोक्स
रॉक साँग स्टे हाय ब्रिटनी हावर्ड
अमेरिकन अल्ब वर्ल्ड ऑन द ग्राउंड सारा जरोस









