प्रतिनिधी /बेळगाव
आम्ही गेल्या 8 ते 9 वर्षांपासून बिम्स हॉस्पिटलमध्ये सेक्मयुरिटी गार्ड म्हणून काम करत आहे. असे असताना अचानकपणे त्याठिकाणी होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबत आम्हाला कोणतीच पूर्वकल्पना देण्यात आली नाही. त्यामुळे आम्ही रस्त्यावर आलो आहे. तेव्हा पूर्वीप्रमाणेच आम्हाला बिम्समध्ये सेक्मयुरिटी गार्ड म्हणून काम द्यावे, अशी मागणी बिम्स हॉस्पिटलमधील सेक्युरिटी गार्डनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली.
बिम्समध्ये आम्ही 65 जण काम करत आलो आहे. योग्यप्रकारे आणि सर्व नियमांनुसार काम करत असताना अचानकपणे आम्हाला कमी करण्यात आले. कामावरून कमी करायचे असेल तर आम्हाला नोटीस दिली पाहिजे. मात्र, नोटीस वगैरे न देता कमी केले. कोरोना काळात दुसरे कोणतेही काम मिळायचे कठीण झाले आहे. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून तातडीने आम्हाला काम द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी परशुराम बेळगावकर, डी. एच. देशपांडे, गायत्री कर्लठ, रूपा कुंभार, गीता हुदली, नीतू चौगुला, बसवणेप्पा भोरण्णावर, संगीता पचनवर, मायाप्पा फर्नांडिस, भारती पाटील, गजानन पाटील, सुनील पाटील, अजगौड पाटील यांच्यासह सेक्मयुरिटी गार्ड उपस्थित होते.









