दोन तासांच्या थरारानंतर बिबटय़ा जेरबंद
प्रतिनिधी/ त्नागिरी
तालुक्यातील निवळी शेल्टीवाडी येथे चवताळलेल्या जखमी बिबटय़ाने मोठा धुमाकुळ घातल़ा काजू काढण्यासाठी रानात गेलेल्या महिलेवर या बिबटय़ाने गंभीर हल्ला केल़ा त्यानंतर जेरबंद करण्यासाठी आलेल्या वनविभागाच्या अधिकाऱयांवरही बिबटय़ाने हल्ला करून त्यांना जखमी केल़े तब्बल दोन तासांच्या थरारानंतर या बिबटय़ाला जेरबंद करण्यात यश आल़े
अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास घडल़ी या हल्ल्यात लक्ष्मी विष्णू गावडे (58, ऱा शेल्टीवाडी निवळी) ही महिला व वनविभागातील अधिकारी प्रियंका लगड व अन्य एक जण जखमी झाल़े या सर्व जखमींना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आह़े

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मी गावडे शुक्रवारी दुपारी शेल्टीवाडी येथे नातेवाईकांसोबत काजू जमा करण्यासाठी गेल्या होत्य़ा यावेळी रानात दबा धरून बसेलेल्या बिबटय़ाने गावडे यांच्यावर जीवघेणी झडप घातल़ी लक्ष्मी यांच्या चेहऱयावर, हातावर बिबटय़ाने ओरबडून गंभीर जखमी केल़े लक्ष्मी आरडा-ओरडा केला. त्यांच्यासोबत असलेले रत्ना गावडे या हल्ल्याने भांबावून बिबटय़ापासून बचावासाठी झाडावर चढल़े तर बिथरलेला बिबटय़ा दुसऱया एका झाडावर दबा धरून बसला होत़ा
रानातून मोठमोठय़ाने ऐकू आलेल्या आरोळ्यांनी ग्रामस्थांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतल़ी गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मी यांना ग्रामस्थांनी तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात नेल़े या घटनेची खबर वाडीप्रमुख यशवंत नितोरे तसेच विशाल गावडे, चेतन गावडे, शैलेश खापरे, परशुराम कदम यांनी पोलीस पाटील भालचंद्र शितप यांना दिल़ी त्यानंतर वनविभागालाही कळवण्यात आले. वनविभागाची यंत्रणा काहीवेळातच अधिकाऱयांसह निवळी येथे दाखल झाली.
हल्ला झालेल्या ठिकाणी वनविभागाच्या अधिकारी प्रियंका लगड व ग्रामस्थ पाहणी करत असतानच झाडावर दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने लगड यांच्यावर झडप घातल़ी त्यांच्या पायाला चावा घेण्याचा प्रयत्न केल़ा या हल्ल्यात त्या जखमी झाल्य़ा यावेळी सोबत असणाऱया वनविभागाच्या कर्मचाऱयांनी त्यांची सुटका केली.
लगड यांना बिबटय़ाच्या तावडीतून वाचवताना कर्मचाऱयांनी बिबटय़ाला मोठय़ा शिताफिने पकडले. मागोमाग आलेल्या वनविभागाची दुसऱया टीमने जखमी बिबटय़ाला पिंजऱयात डांबले. या हल्ल्यात जखमी झालेल्या वनअधिकारी प्रियंका लगड यांच्यासह तिघांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.









