वार्ताहर / राजापूर
बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिघांना राजापूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. जयेश बाबी परब, (वय-23), दर्शन दयानंद गडेकर (20) व दत्तप्रसाद राजेंद्र नाईक (22, सर्व रा. शिरोडा, ता. वेंगुर्ले, जि.सिंधुदुर्ग) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याजवळी बिबट्याची कातडीही जप्त केली आहे. दरम्यान या तीनही आरोपींना राजापूर प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठाडी सुनावली आहे. राजापूर शहरात झालेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार दि.20 रोजी रात्री 9.30 वाजता मुंबई गोवा हायवेवरील राजापूर शहरालगतच्या पेट्रोल पंपावर दोन दुचाकीस्वारांची हालचाल संशयास्पद आढळून आले. रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या संशयितांची चौकशी केली. यावेळी त्यांच्याकडील बॅगांची तपासणी केली असता एका बॅगेमध्ये बिबट्या या वन्य प्राण्याची कातडी आढळून आली. त्यामुळे वन्य प्राण्याची तस्करी केल्यापकरणी जयेश परब, दर्शन गडेकर व दत्तप्रसाद नाईक यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.
आरोपीकडून बिबट्याची कातडी जप्त करून घेतली असून सर्व आरोपींच्या विरोधात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972चे कलम 9, 39, 51, 52 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच आरोपींच्या ताब्यातील दोन मोटरसायकल जप्त केल्या आहेत. तसेच ओप्पो, रेडमी, विवो या कंपन्यांचे मोबाईल आरोपीकडून जप्त करून ताब्यात घेतले आहेत. सदर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे वनविभागामार्पत स्पष्ट करण्यात आले असून असून पुढील तपास सूरू आहे.
सदरची कार्यवाही कोल्हापूर पादेशिक मुख्य वनसंरक्षक डॉ.व्ही.क्लेमेंट बेन, विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी श्रीम.प्रियंका लगड, राजापूर वनपाल स.व.घाटगे, लांजा वनपाल दि.वि.आरेकर, संगमेश्वर वनपाल तौ.र.मुल्ला, राजापूर वनरक्षक सागर गोसावी, कोर्ले वनरक्षक सागर पताडे, साखरपा वनरक्षक न्हा.नु.गावडे, वनरक्षक वनउपज तपासणी नाका साखरपा संजय रणधीर, वनरक्षक वनउपज तपासणी नाका साखरपा राहूल गुंठे यांनी पार पाडली.
दरम्यान या तीनही आरोपींना राजापूर प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठाडी सुनावली आहे. वनविभागाच्या वतीने सरकारी वकील ओमकार अनिल गांगण यांनी बाजू मांडली. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये बिबट्या हा वन्यप्राणी अनुसूची 1 मध्ये येतो. त्याची शिकार केल्यास 3 ते 7 वर्षापर्यंत कारावास किंवा 25 हजार रूपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मध्ये आहे.
Previous Articleगणेशमूर्तीचे दागिने चोरणारा चोरटा ताब्यात
Next Article आंबेवाडी ग्रामपंचायत शिपाई लाचलुचपतच्या जाळ्यात









