नवी दिल्ली
भारतातील आघाडीवरची ऑनलाइन एज्युकेशन स्टार्टअप बायजूने आकाश एज्युकेशन सर्व्हिसेसचे नुकतेच अधिग्रहण केले आहे.
अधिग्रहण व्यवहार हा 7 हजार 300 कोटी रुपयांना झाला असल्याचे सांगण्यात येते. सोमवारी याबाबतचे स्पष्टीकरण बायजूने दिले आहे. ऑनलाइन शिक्षण क्षेत्रातील आजवरचा हा सर्वात मोठा व्यवहार असल्याचे बोलले जात आहे. आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस ही अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या तयारीसंबंधीचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. आकाशने मिळवून दिलेली ही संधी आमच्यासाठी खूप मोठी असल्याचे म्हटले आहे. टायर टू व टायर थ्री शहरांमध्ये आकाशच्या शाखा आहेत.









