कोईमतुर
बिग बास्केटने मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाउनच्या काळात दोन दिवसातच 80 टक्के कर्मचाऱयांना कमी केलं होतं. पण आता कंपनीच्या व्यवसायाने उत्तम कामगिरी नोंदवली असल्याने नव्याने भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या 16 दिवसांच्या कालावधीत 12 हजाराहून अधिक जणांना कंपनीने नोकरीत सामावून घेतले असल्याचे कळते. व्यवसाय वाढवण्यास या नव्या उमेदवारांचा चांगला हातभार लागणार असल्याचे कंपनीचे सीईओ हरी मेनन यांनी सांगितले. नव्या उमेदवारांना बिग बास्केटमध्ये घेण्याआधी त्यांना योग्य क्षमतेचे परिपूर्ण प्रशिक्षण दिले असल्याचे मेनन यांनी स्पष्ट केले.









