बेळगाव : बिग बझार या भारतातील प्रसिद्ध डिपार्टमेंटल स्टोअर्सनी आपल्या ग्राहकांकरिता ‘बिग मोमेंट्स की बिग शॉपिंग विथ बिग बझार’ योजना 13 तारखेपासून अंमलात आणली आहे. फॅशन, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स वा लगेज काहीही आणि कितीही येथे उपलब्ध आहे.
या सणासुदीच्या काळात ग्राहकांना असंख्य वस्तूंची गरज भासते. त्याकरिता एका दुकानातून दुसऱया दुकानात असे हेलपाटे मारावे लागतात. पण आता बिग बझारने आपल्या गरजेच्या सर्व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या आहेत. तेही रास्त दरात आणि भरघोस बक्षिसांसोबत.
आता बिग बझारने इन-स्टोअर आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दोन तासांत घरपोच सेवाही मिळणार आहे. 15,000 रु. च्या खरेदीवर 4998 ची अंबर लगेज ट्रॉली मोफत मिळणार आहे. तसेच 10 हजाराच्या खरेदीवर आटा, डाळ, तांदूळ, तूप, साखर आणि 1000 रु. चे फॅशन मोफत मिळणार आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कंपनीचे सीएमओ पवन सारडा यांनी केले आहे.









