प्रतिनिधी/गगनबावडा
बावेली येथे चिखलाची दलदल तयार झाल्याने मुख्य रस्त्याची घसरगुंडी बनली आहे. हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
बावेली कळे मार्गे कोल्हापूर हा धामणी खोरीतील प्रमुख मार्ग होय. बावेली (या.गगनबावडा) येथे पेठ वसाहत ते हरिजनवाडा दरम्यान मुख्य रस्त्यालगत नळयोजनेसाठी चरखुदाई केली होती. पाऊस पडताच बाजूचा मातीचा ढिग मुख्य मार्गावर वाहून आला.एक किमी अंतरावर दलदल माजली आहे. चिखल साचल्याने पायी देखिल जाता येत नाही.दुचाकीधारकांना चांगलाच फटका बसला आहे. दिवसांतून कित्येकजण घसरुन पडत असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








