प्रतिनिधी / सातारा
लग्न होत नसल्याने आलेल्या नैराश्याने बावधन येथील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रदीप गंगाराम पिसाळ (वय 30 )असे त्या युवकाचे नाव आहे.
याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दत्तात्रय पिसाळ यांनी दिलेल्या खबरेनुसार प्रदीप पिसाळ याने दि.23रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बिरोबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. लग्न होत नसल्याने आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची म्हटले असून वाई पोलीस तपास करत आहेत.