प्रतिनिधी/सातारा
साताऱ्यात दोन राजे समर्थकांमधील वैर आणि हाणामारी सातारकर नागरिकांना नवी नाही. अशीच भांडणे बुधवारी रात्री सनी भोसले आणि बाळु खंदारे यांच्यात झाली. गाडी ऑफिसपुढे लावण्यावरून झालेल्या या वादावादीत सनी भोसलेवर जीवघेणा हल्ला झाला. हा हल्ला करून बाळू फरार झाला. शहर पोलिसांनी संपूर्ण रात्र जागून काढली पण बाळू काय सापडला नाही. बाळुच्या मागे एक नाही तर दोन पथके पाठवली आहेत. पण एकाही पथकाला अजून बाळुचा शोध लागला नाही.
सुरूची राडय़ानंतर शिवेंद्रराजे समर्थक आणि उदयनराजे समर्थक यांच्यात होणाऱ्या भांडणाचे प्रमाण कमी झाले होते. पोलिसांचा वॉच वाढल्याने शहरात जणू शांतताच पसरली होती. यामुळे पुन्हा असा राडा होणार नाही असा विचार सातारकर नागरिकांच्या मनातही आला नव्हता. परंतु दुर्गा पेठेत बुधवारी रात्री गाडी ऑफिस समोर लावण्याच्या कारणावरून सुरू झालेली किरकोळ वादावादी पुढे जावून हाणामारीत बदलली. सनी भोसले वर बाळु खंदारेने जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला होताच शहरात काही तासाच तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. बाळु खंदारे हल्ला करून बुधवारी रात्रीच फरार झाला. बाळुला शोधण्यासाठी सातारा शहर पोलीसांनी दोन पथकेही पाठवली. परंतु पाच दिवस उलटूनही बाळुचा शोध लागलेला नाही. सातारा शहर पोलीसांनी अनेक गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. परंतु बाळु खंदारेला पकडण्यात पोलिसांना यश मिळत नसल्याने पोलीसांच्या तपास यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उभे राहत आहे.
श्री सुंदर तपास अधिकारी नावाला
सनी भोसले आणि बाळु खंदारे यांच्यात झालेल्या राडय़ांचा तपास शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस इन्पेक्टर श्री सुंदर करत आहेत. या प्रकरणात काय तपास सुरू आहे. यांची ठोस माहिती पोलीस इन्पेक्टर श्री सुंदर यांनाच नीट नसल्याचे त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट होते. त्यांना माहितीचा अभाव असल्याने बाळुचा शोध त्या कसा लावणार याकडे सातारकर नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









