मुंबई / ऑनलाईन टीम
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज (31 मार्च) पार पडणार आहे. आज संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी पार्क येथील महापौरांचे जुने निवासस्थान या स्मारकाची नियोजित जागा आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोशल मीजियाच्या माध्यमातून या भूमिपूजन सोहळ्याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आज संध्याकाळी 5.00 वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले जाणार आहे. दादरच्या शिवाजी पार्कमधील जुना महापौर बंगल्यात हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्यात येईल.
सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. याचा विचार करता हा सोहळा ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थितीत राहणार आहेत.
Previous Articleसोलापूर : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी ४४ अर्ज दाखल
Next Article दिल्लीतील कोरोना रुग्ण संख्येत किंचित घट








