प्रतिनिधी/ तिसवाडी
मौळा तिसवाडी येथी श्री बाल गणेश उत्सव विविध कार्य कार्यक्रमांनिशी उत्साहात साजरा करण्यात आला. बाल गणेश उत्सवाचा 5 वा दिवशी यजमान कु. अनिकेत अंकुश नाईक यांच्याहस्ते दुपारी आरती, घुमट आरत्या, तिर्थप्रसाद व नंतर महाप्रसाद झाला. सायंकाळी 7.30 वा. कला अकादमी आयोजित अ. गो. भजन स्पर्धेत प्रथम स्थान पटकावलेल्या संगीत शारदा विद्यालय मंदिर-बाल भजनी मंडळ, डोंगरी, तिसवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम रंगला. यात प्रथम गायक- संज्ञा सोमनाथ च्यारी, दुसरा अभंग गायक रश्मी सुशांत बकाल, गवळण गायक- वेदीका हरेंद्र शिरोडकर, संवादिनीसाथी सोहम प्रवीण कुर्तिकर तर पखवाजसाथी दक्ष देवानंद कुर्तिकर व सहकारी भजनी कलाकारांनी भाग घेतला. नंतर स्थानिक भजनी कलाकारांच्या भजनाचा कार्यक्रम झाला. श्री सोमनाथ च्यारी यांनी गवळण सादर केली तर श्री नागेश च्यारी यांनी भैरवी म्हटली. नंतर स्थानिक बालगणेश मंळाच्या भक्तगणांतर्फे घुमट आरत्या, तीर्थप्रसाद होऊन श्रींच्या उत्सवातील पाचव्या दिवसाची सांगता झाली.









