हा प्रेरणादायी प्रवास आग्रा येथील एका मुलीचा आहे. घरच्या गरीबीमुळे बालपणीच तिला मोल मजुरी करावी लागली. त्याशिवाय पोट भरणे शक्य नव्हते. तथापि, तिचा निर्धार मोठा. त्यामुळे या परिस्थितीवरही मात करुन तिने कमी वयातच बालकामगारांच्या समस्यांवर प्रबोधन करणारी समुपदेशक होण्यार्पंत प्रगती केली. या मुलीचे नाव आहे, तिचे नाव आहे पूनम मुरारी. आग्राच्या लोहामंडीची ती रहिवासी आहे. महिला सबलीकरणाची हे उदाहरण आहे.
बालपणापासून कामे करावी लागल्याने तिचे शिक्षण अर्धवट राहिले. तरीही शिक्षणाची आवड आणि त्यासंबंधीची आस्था सुटली नाही. काही वर्षे काम केल्यानंतर ती बालमजूर शिक्षण प्रबोधन संस्थेची सदस्य बनली. तिला ‘चाईल्ड लाईन टीम’चे सदस्यत्व मिळाले. तिचे पिता भाजी विक्रेते आहेत. त्यांच्या उत्पन्नात घर चालत नसल्याने तिला मिळेल तेथे काम करावे लागले. तिच्या पित्यावर त्यांच्या बहिणीच्या संसाराचीही जबाबदारी आहे.
तिने चपला तयार करण्याच्या व्यवसायापासून अनेक कामे केली आहेत. अशी कामे 7-8 वर्षे केल्यानंतर 2012 मध्ये बालकामगारांच्या हितासाठी काम करणारी संस्था चेतनाच्या संपर्कात ती आली. ही संस्था अशा बालकांचे शिक्षण, आरोग्य इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेचे काम मनापासून करुन तिने आपले स्थान निर्माण केले. दोन वर्षांपूर्वी ती या संस्थेच्या आग्रा शाखेची अध्यक्षाही बनली. ही संस्था चाईल्ड वेलफेअर संस्थांची सलग्न आहे.









