दोन तास वाहतूक ठप्प
प्रतिनिधी / वाकरे
कोल्हापूर-गगनबावडा राज्य रस्त्यावर बालिंगे पुलाच्या पूर्वेस उसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह रस्त्यावर पलटी झाला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बालिंगे गावाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी सव्वा एक वाजता वाहतूक सुरळीत झाली. ११.३० च्या वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना, असळज, गगनबावडा येथे उसाने भरलेला ट्रॅक्टर जात होता. सकाळी ११.३० च्या सुमारास बालिंगे पुलाच्या पूर्वेस हा ट्रॅक्टर आल्यावर ट्रॅक्टरवरील चालकाचा ताबा सुटल्याने उसाची ट्रॉली ट्रॅक्टरसह रस्त्यावर पलटी झाली.ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ऊस संपूर्ण रस्त्यावर पसरल्याने या राज्यरस्त्यावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक दोन तास ठप्प झाली. बालिंगेपासून दोनवडे तर पूर्वेकडे फुलेवाडी पेट्रोल पंपापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने पलायन केले. सरपंच मयूर जांभळे, स्थानिक नागरिक व तरुणांनी रस्त्यावरील ऊस व ट्रॅक्टर जेसीबीच्या साहाय्याने बाजूला केल्यानंतर दुपारी सव्वा एक वाजता वाहतूक सुरळीत सुरू झाली. सुरुवात केली आहे.









