प्रतिनिधी / वाकरे
कोल्हापूर – गगनबावडा राज्यरस्त्यावर बालिंगे येथील भोगावती नदीच्या पुलावर अज्ञातांनी वापरलेल्या पीपीई किट फेकून दिल्या, मात्र नागदेववाडीच्या तरुणांनी प्रसंगावधान राखून त्या पेटवून दिल्याने पुढील अनर्थ टळला.याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कोविड सेंटर आणि दवाखान्यात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पीपीई किट वापरले जातात.
कोल्हापूर- गगनबावडा राज्यरस्त्यावर बालिंगे (ता. करवीर ) येथील भोगावती नदीवरील पूलावर रविवारी सकाळी अनिल ढेरे आणि नंदकुमार पोवार( रा.नागदेववाडी) हे व्यायाम आणि सायकलिंगसाठी गेले असता त्यांना भोगावती पुलाच्या डाव्याबाजूला प्लास्टिकची बॅग नजरेस पडली.
त्यांनी खाली उतरून पाहिले असता त्यामध्ये पीपीई किट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या बॅगमध्ये सहा वापरलेल्या पीपीई कीट, हॅन्ड ग्लोवज, सलाईन बाटली, चष्मा, मास्क, फेसशील्ड अशा काही वस्तू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी व्यायाम थांबवून घराकडे धाव घेतली. घरातून पेट्रोल घेऊन त्यांनी ही बॅग पेटवून देऊन त्याची विल्हेवाट लावली.
मात्र हे करत असताना जाणारे – येणारे कोरोनाच्या भीतीमुळे थांबत नव्हते. अज्ञातांनी या किट नदीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र संरक्षक कठड्याला अडकून त्या खाली पडल्या, अन्यथा त्या नदीमध्ये गेल्या असत्या. नागदेववाडीच्या तरुणांच्या सतर्कतेमुळे ह्या बॅगांची विल्हेवाट लागली आहे. असे कृत्य करणाऱ्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकातुन होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









