प्रतिनिधी / कोल्हापूर
बालिंगा पाडळीजवळील कोगे गावच्या कमानी नजीक रात्रीच्या सुमारास गव्याचे दर्शन झाले. नवीन कोगे रोड कमान ते कोगे ओढा रोड या ठिकाणी ३ गवे दिसल्याचे ग्रामस्थ महेश पाटील यांनी सांगितले.
मनुष्य वस्तीच्या परिसरात गवा दिसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. जंगल परिसरात राहणारा गवा मनुष्य वस्तीत घुसखोरी करत असल्याने नागरिकांतून चिंता व्यक्त होत आहे.









