नवी दिल्ली
वेफर्स आणि पॅकेजड स्नॅक्सची निर्मिती करणारी कंपनी बालाजी वेफर्स प्रायव्हेट लिमिटेड आता गुजरातच्या बाहेर आपला नवा प्रकल्प सुरू करण्याचा विचार करते आहे. आता कंपनी आपला मोर्चा उत्तर भारताकडे वळवत आहे. उत्तर प्रदेशात फूड पार्क बनवण्याची योजना कंपनीची असून ज्याकरीता 600 ते 700 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची तयारी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात कानपूर व लखनऊ याठिकाणी पार्कसाठी जागा कंपनीने पाहिली आहे. याठिकाणी प्लांट उभारण्यासाठी प्रयत्न होणार असल्याचे समजते.









