वृत्तसंस्था/ पुणे
बालेवाडी क्रीडा संकुलात सुरू असलेल्या 2022 टाटा पुरस्कृत महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या श्रीराम बालाजी आणि विष्णूवर्धन यांचे पुरूष दुहेरीतील आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले.
ऑस्ट्रेलियाच्या सेव्हेली आणि जॉन पॅट्रीक स्मिथ या जोडीने भारताच्या श्रीराम बालाजी आणि विष्णुवर्धन यांचा 6-2, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत पोलंडच्या कॅमिल मॅजेरझेकने एकेरीतील उपांत्य फेरी गाठताना इटलीच्या मुसेटीचा 6-2, 6-7 (7-5), 6-4 असा पराभव केला. सदर स्पर्धा महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेतर्फे खेळविली जात असून रविवारी या स्पर्धेचा समारोप होईल. पोलंडच्या मॅजेरझेकचा उपांत्य फेरीचा सामना फिनलँडच्या रूसुव्होरीशी होणार आहे. रूसुव्होरीने या स्पर्धेतील विद्यमान विजेता व्हेसेलीचा 6-3, 6-4 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले आहे.









