सातारा / प्रतिनिधी :
साताऱ्यातील पोवईनाक्यावर शुभम टॉवर इमारतीत असलेल्या बालाजी डायग्नोस्टिक लॅबकडून इमारतीतील पहिल्या मजल्यावरील जिन्याच्या कॉमन प्रिमायसेसमध्ये रुग्णाला बसवून नियमांचे पालन न करता कोरोनाची आरटीपीसीआर टेस्टिंग करण्यात येत आहे. यामुळे या इमारतीतील रहिवाशांना धोका निर्माण झाल्याने याबाबत लॅबच्या चालक डॉ. संध्या यादव यांच्याविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात तसेच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे तक्रार दाखल झालेली आहे.
नागेश शिवाजी साळुंखे वय 37, रा. पहिला मजला, शुभम टॉवर, पोवईनाका, रविवार पेठ, सातारा यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी बालाजी डायग्नोस्टिक सेंटरच्या चालक डॉ. संध्या यादव यांच्यावर गुन्हा दाखल केला असून या गुन्हय़ाचा अधिक तपास सहाय्यक फौजदार शिंदे करत आहेत.









