ऑनलाईन टीम / श्रीनगर :
भारतावर हल्ला करण्यासाठी बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा तळ पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. तिथे 27 दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.
पुलवामा येथे दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय लष्कराने एअर स्ट्राईक करत बालाकोट येथील दहशतवाद्यांचा तळ उध्वस्त केला होता. तो तळ आता पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मसूद अझहरचा मुलगा युसूफ अझहर सध्या जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्मया असून, तो भारतावर हल्ला करण्यासाठी 27 दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे. 27 मधील 8 दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधील आहेत. या दहशतवाद्यांना पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि पंजाबचे काही दहशतवादी प्रशिक्षण देत आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे दहशतवादी भारतावर हल्ला करतील, असेही सांगण्यात आले आहे.