प्रतिनिधी/कोल्हापूर
कणकवली येथे पार पडलेल्या बालनाटय़ स्पर्धेत योगेश सोमण लिखित आणि ललिता शिंदे दिग्दर्शित ‘झेप’ या बालनाटय़ाने सांघिक तृतीय क्रमांक पटकावला. त्यांच्या या यशाबद्दल नाटय़ क्षेत्रातून कौतुक होत आहे, अशी माहिती शिंदे अकादमीच्या ललिता शिंदे यांनी प्रसिध्द केली आहे.
बालनाटय़ स्पर्धेत जिजा वालकर, समीक्षा संकपाळ व नारायण सूर्यवंशी या बालकराकारांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे. ‘झेप’ या नाटकामध्ये स्वरूपा बिलावर, अर्काय दिलवर, किरण शिंदे, रजत आंबेकर, श्रेयस पाटील, नारायणी मुधोळकर, अनुष्का कांबळे या बालकलाकारांनी भूमिका केल्या आहेत. त्यांना सुनिल शिंदे, संदीप शिंदे, रजत सोनार, निता शिंदे, शुभम सोनार यांचे मार्गदर्शन लाभले.









