2015 पासून ऑडिटच नाही : ऑडिटनंतरच सर्वसाधारण सभा
प्रतिनिधी /बेळगाव
अत्यंत प्रतिष्ठेची मानली गेलेली बार असोसिएशनची निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 2015 पासून ऑडिटच झाले नाही. त्यामुळे ऑडिट पूर्ण झाल्यानंतर सर्वसाधारण सभा होणार आहे. त्यानंतरच बार असोसिएशनच्या निवडणुकीबाबत निर्णय घेण्याची शक्मयता निर्माण झाली आहे.
बार असोसिएशनच्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्याची चर्चा सुरू होती. बरेच जण निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र, 2015 पासून आतापर्यंत बार असोसिएशनच्या जमा-खर्चाचे ऑडिटच झालेले नाही. त्यामुळे ऑडिट झाल्यानंतरच सर्वसाधारण सभा घेतली जाणार आहे. त्या सभेमध्ये निर्णय घेऊन ही निवडणूक जाहीर होण्याची शक्मयता आहे.
बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी मागील निवडणुकीपेक्षा यावेळी 300 हून अधिक मतदार वाढले आहेत. आता दोन हजार मतदार झाल्याचे सांगण्यात आले. अनेक वकिलांनी फी भरून बार असोसिएशनचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यामुळे मागील वेळेपेक्षाही ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्मयता आहे.
याबाबत बार असोसिएशनचे उपाध्यक्ष गजानन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता अजून ऑडिट झालेले नाही. त्यामुळे निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्मयता त्यांनी व्यक्त केली. आम्ही सर्व जमा-खर्च देऊन ऑडिट करण्यासाठी प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी सांगितले. एकूणच गेल्या दोन महिन्यांपासून अनेकांनी निवडणुकीची तयारी केली आहे. पण या निवडणुकीस विलंब होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.









