एकूण 16 जणांनी भरले अर्ज, आज शेवटचा दिवस
प्रतिनिधी /बेळगाव
बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आता केवळ एक दिवस शिल्लक राहिला आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्याची संख्या बुधवारी वाढणार आहे. मंगळवारी 6 जणांनी अर्ज दाखल केले असून आतापर्यंत विविध पदांसाठी 16 अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी शेवटचा दिवस असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्मयता आहे.
सध्या अध्यक्षपदासाठी केवळ एकच अर्ज आला आहे. ऍड. प्रभू यतनट्टी यांनी अर्ज दाखल केला आहे तर उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी चार जणांनी अर्ज केले आहेत. जनरल सेपेटरी पदासाठीही चार अर्ज दाखल झाले आहेत. जॉईंट सेपेटरीसाठी केवळ एकच अर्ज आहे तर कमिटी सदस्यांसाठी 6 अर्ज दाखल झाले आहेत.
बार असोसिएशन निवडणूक मोठय़ा चुरशीने दरवेळी पार पडते. यावेळीही या निवडणुकीत चुरस वाढली असून अध्यक्षपदाबरोबरच उपाध्यक्ष आणि जनरल सेपेटरी पदासाठी अनेक जण रिंगणात उतरण्याची शक्मयता आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. अर्ज दाखल करण्यास आणखी एक दिवस शिल्लक आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी अधिक अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
उपाध्यक्षपदासाठी ऍड. लक्ष्मण पाटील, ऍड. अमित कोकितकर, ऍड. विनोद शंकरगौडा पाटील, ऍड. सुधीर बी. चव्हाण, जनरल सेपेटरी पदासाठी ऍड. सतीश बिरादार, ऍड. शिवलिंगाप्पा बुदिहाळ, ऍड. रवींद्र गुंजाळे, ऍड. एस. हिरेमठ, जॉईंट सेपेटरी पदासाठी ऍड. विश्वनाथ सुलतानपुरे, कमिटी सदस्यासाठी ऍड. चंद्रशेखर हिरेमठ, ऍड. महांतेश पाटील, ऍड. राकेश पाटील, ऍड. आनंद घोरपडे, ऍड. आदर्श पाटील, ऍड. मुरलीधर भस्मे यांनी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून एस. बी. तुबाची काम पाहत आहेत.
गुरुवार दि. 11 रोजी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. दुपारी 3 पर्यंत अर्ज माघार घेण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. सायंकाळी 5 वाजता रिंगणात असणाऱया उमेदवारांची नावे प्रसिद्ध केली जाणार आहेत. त्यानंतरच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. याचबरोबर निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढणार आहे.









