वृत्तसंस्था/ माद्रीद
ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी येथे झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू लायोनेल मेसीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर बार्सिलोना क्लबने ग्रेनाडाचा 4-0 अशा गोल फरकाने दणदणीत पराभव केला. या विजयामुळे बार्सिलोनाने स्पर्धेच्या गुणतक्त्यात तिसरे स्थान मिळविले.
या सामन्यात मेसीचा खेळ आक्रमक आणि वेगवान झाला. नव्या वर्षांच्या फुटबॉल हंगामात मेसीने तीन सामन्यात 4 गोल नोंदविले आहेत. बार्सिलोनाचा पहिला गोल रॉबर्टो सोलदादो याने केला. बार्सिलोनाचा दुसरा गोल फ्रान्सचा फुटबॉलपटू ग्रिझमनने केला. मेसीने बार्सिलोनाचा तिसरा आणि चौथा गोल नोंदवून ग्रेनाडाचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात ऍटलेटिको माद्रीद पहिल्या स्थानावर आहे. ऍटलेटिको माद्रीद आणि ऍथलेटिक बिलबाओ यांच्यातील शनिवारचा सामना गारपीट आणि वादळी पावसामुळे लांबणीवर टाकण्यात आला. सेव्हिलाने रियल सोसिदादवर 3-2 अशा गोलफरकाने विजय मिळविला. सेव्हिलातर्फे यूसेफ नसरीने शानदार हॅट्ट्रीक नोंदविली.









