वृत्तसंस्था/ बार्सिलोना
सोमवारी युफाने काढलेल्या चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या शेवटच्या 16 संघांतील ड्रॉनुसार बार्सिलोनाची लढत पॅरीस सेंट जर्मन (पीएसजी) संघाबरोबर होणार आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील विद्यमान विजेता बायर्न म्युनिचचा सामना इटलीच्या लॅझिओ बरोबर होणार आहे.
चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या शेवटच्या 16 संघांचा सोमवारी युफातर्फे ड्रॉ काढण्यात आला. प्रिमियर लीग चॅम्पियन्स लिव्हरपूलचा सामना आरबी लिपझिग बरोबर होणार आहे. ऍथलेटिको माद्रीद आणि चेल्सी त्याचप्रमाणे मँचेस्टर सिटी आणि बोरूसिया माँचेनग्लाडबॅच तसेच इटालियन चॅम्पियन्स युवेंट्स आणि पोर्टो, सेव्हिला आणि बोरूसिया डॉर्टमंड, ऍटलांटा आणि रियल माद्रीद असे सामने खेळविले जाणार आहेत. हे सामने 16 फेब्रुवारीपासून सुरू होतील.









