वृत्तसंस्था/ बार्सिलोना
बार्सिलोना एफसीचा लेफ्टबॅक जॉर्डी अल्बाला येत्या रविवारी रियल मॅलोर्काविरुद्ध होणाऱया लढतीला मुकावे लागणार आहे. त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे त्याच्या क्लबने सांगितले.
ख्रिसमसच्या कालावधीत कोरोनाची लागण झालेला 32 वर्षीय अल्बा हा बार्सिलोनाचा तिसरा खेळाडू आहे. याआधी बचावपटू क्लेमेंट लेंगलेट, डॅनी अल्वेस यांनाही लागण झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले होते. त्याची प्रकृती उत्तम असून घरीच तो सेल्फआयसोलेशनमध्ये असल्याचे क्लबने सांगितले. 21 डिसेंबर रोजी सेव्हिलाविरुद्ध त्याने शेवटचा सामना खेळला होता. 18 सामन्यात 28 गुणांसह बार्सिलोना सातव्या स्थानावर आहे.









