प्रतिनिधी / बार्शी
शहरातील एक युवकाने गोल्डन मास्क बनवून घेतला आहे. हॉटेल व्यावसायिक असलेल्या सागर जानराव यांना सोने खरेदीची मोठी आवड असून कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर चक्क ५ तोळे सोन्याचा गोल्डन मास्क त्यांनी बनवून घेतला आहे.
कोरोनाने माणसाला गरिबी, श्रीमती, पैसा-अडका अन माणुसकी, सर्वकाही दाखवलं. मात्र, कधीही वापरात नसलेलं मास्क अन सॅनिटायझर माणसाची गरज बनलं. आता, या गरजेची हौस करणं म्हणजे नवलच. हौसेला नसते मोल, हौस हीच अनमोल असं म्हणत शहरातील सागर जानराव यांनी 5 तोळे सोन्याचा मास्क बनवला आहे. अंदाजे २.४ लाख किंमतीचा मास्क तोंडावर अडकवून ते सध्या वावरत आहेत. त्यांच्या गोल्डन मास्कची चर्चा मित्रपरिवार आणि शहरात चांगलीच रंगली आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड येथील एका व्यावसायिकाने सोन्याचा मास्क खरेदी केला होता. आता, बार्शीतील युवकाचाही गोल्डन मास्क चर्चेचा विषय बनला आहे.
Previous Articleकोरोना : WHO ने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स
Next Article गांधीनगरमधील व्यापाऱ्याला कोरोना लागण








