प्रतिनिधी / बार्शी
यंदाचा पावसाळा हंगामातील परतीच्या पावसाने बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये जोरदार हजेरी लावत अगदी मुसळधार पावसाची आज दिवसभर शहरांमध्ये सुरुवात झाली होती.
अगदी पहाटेपासूनच बार्शी शहर तालुक्यात सुरू झालेल्या पावसाने एकच हाहाकार माजवला आहे बार्शी तालुक्यातील सर्व ओढे, नाले, बंधारे, सर्व मध्यम , लघु मध्यम प्रकल्प नद्या दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र आज पाहायला मिळत आहे. आजच्या या मुसळधार पावसाने तालुक्यातील शेतकरी वर्ग परत एकदा अडचणीत येणार असून शेतकरी वर्गाची सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत. तसेच शहरांमध्ये प्रत्येक रस्त्यावर ती तीन ते चार फूट पाणी साचले असून अनेकांच्या घरात पाणी शिरलेले पाहायला मिळाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज सकाळपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस शहरांत तालुक्यात जोरदार बरसत आहे. दुपारी चार वाजेपर्यंत पावसाचा बार्शी शहरातील जोर कायम होता. पावसाचा जोर कायम असल्याने बार्शी शहरातील सर्व रस्त्यावर ती पाणी साचलेले पाहायला मिळाले यात अलीपूर रोड, बार्शी तील मुख्य बाजारपेठ असणारी सोमवार पेठ,मंगळवार पेठ, प्रसन्नदाता मार्ग, महाद्वार चौक भिम नगर, हांडे गल्ली, कुर्डुवाडी रोड, सोलापूर रोड, स्टँड चौक आदी भागात प्रचंड पाणी साचलेले पाहायला मिळाले. बार्शी शहरातील मलिक चौक ते एकवीरा मंदिर या भागांमध्ये रस्त्यावरती चार ते पाच फूट पाणी साचलेले पाहायला मिळाले आज शहरांमध्ये अनेक रस्त्यावरती नदी वाहते काय अशी परिस्थिती पाहायला मिळत होती.
या पाण्यामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. नागरिकांच्या दैनंदिन वापरात असणाऱ्या वस्तू, धान्य या घरात पाणी घुसल्यामुळे खराब झालेले पाहायला मिळाले. बार्शी शहराच्या उत्तरेस बाजूला असणारा गणेश तलाव हा तलाव तुडुंब भरल्याने सर्व बाजूने सांडव्याची द्वार आज खुली केली आहेत. तसेच नांदेडकर ताल हीसुद्धा खुली केल्याने पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे. परंतु पावसाचा जोर मात्र अजूनही कायम असल्याने पाण्याचा प्रवाह काही कमी होताना दिसत नाही.
बार्शीच्या ग्रामीण भागात तर अनेक शेतांमध्ये पाणी साचून ऊस, सोयाबीन मूग अशा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊस मात्र झोपलेले आहेत. बार्शी शहराला जोडणारे सर्व रस्ते बंद झाले असून अनेक नद्यांना वड्यांना पुलावरून तीन ते चार फूट पाणी चालू आहे. ग्रामीण भागाचा संपर्क बार्शी तालुक्याचे अनेक ठिकाणी संपर्क तुटला आहे. पाण्याचा निचरा करण्याचे काम प्रशासनाने युद्धपातळीवर हाती घेतले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









