बार्शी/प्रतिनिधी
कोरोना या विषाणूचा बार्शी तालुक्यामध्ये झालेला शिरकाव ही चिंतेची बाब असून आज बार्शी तालुक्यातील जामगाव येथील पॉझिटिव निघालेला एक वृद्ध सोलापूर येथे उपचार घेत असताना तो मयत झाला असून या वृद्धाच्या संपर्कातील जामगाव (आ) या गावातील आणखी तीन रुग्ण पॉझिटिव निघाल्याची माहिती बार्शी तहसीलदार प्रदीप शेलार यांनी दिली तर हे तीन पॉझिटिव्ह निघालेले रुग्ण हे त्या वृद्धाचे नातेवाईक असून त्यातील एक रिक्षाचालक आहे की ज्याने आपल्या रिक्षातून या वृत्तास दवाखान्यापर्यंत गेले होते.
याबाबत अधिक वृत्त असे की दिनांक 16 मार्च रोजी मुंबई येथील रहिवासी असलेला एक वृद्ध आपल्या मुलीकडे म्हणजे बार्शी तालुक्यातील जामगाव(आ) या गावी आला होता. तो गावी आल्यानंतर त्यास सर्दी, ताप आणि खोकला अशी लक्षणे दिसून आली. त्यानंतर बार्शीतील एका स्वतःला डॉक्टर म्हणवणाऱ्या तोतया डॉक्टरने या रुग्णास घरीच सलाईन लावून उपचार केले होते. मात्र या वृद्धास अशक्तपणा आणि श्वास घेण्यास अडचण जाणवू लागल्याने या वृद्धाचे जावई यांनी या रुग्णास दुचाकीवरून बार्शी या ठिकाणी आणले. बार्शी या ठिकाणी आल्यानंतर खाजगी दवाखान्यात त्यांनी उपचार करण्याचा प्रयत्न केला मात्र बार्शीतील तीन नामांकित खासगी दवाखान्यात या वृद्धास दाखल करून घेण्यास नकार दिला आणि नंतर त्याने एका रिक्षामध्ये बसवून त्यांना ग्रामीण रुग्णालये या ठिकाणी नेले होते त्या वृद्धाचे चाचणी केल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव आला आणि त्यास सोलापूरला उपचारासाठी हलवले मात्र आज सकाळी तो वृद्ध मयत पावला असून त्याच्या संपर्कात आलेला जावई तो रिक्षाचालक आणि इतर एक जण असे तिघा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कालच प्रांताधिकारी यांनी जामगाव हे गाव प्रतिबंधित केल्याचे आदेश काढले होते. या गावातील अजून पन्नास व्यक्ती चिखर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राने अलगीकरण कक्षात ठेवले असून या सर्वांची काळजी प्रशासन घेत आहे.
मात्र हे रुग्ण पॉझिटिव्ह असले तरी बार्शी तालुक्यामधील नागरिकांनी घाबरून न जाता आपली स्वतःची काळजी घ्यावी आणि कोरोनापासून आपला बचाव करण्याचे आवाहन तहसीलदार प्रदीप शेलार यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








