प्रतिनिधी / बार्शी
देशात सुरू असणाऱ्या लॉकडाऊनचे उल्लंघन करून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या बार्शीतील अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. तालुका पोलिसांनी छापा टाकून सात बॅरलमधील ८०० लिटर रसायन नष्ठ केले. तर १ लाख २० हजारांच्या मुद्देमालासह तिघांना ताब्यात घेतले. आज सकाळी बार्शी येडशी रस्त्यावरील जामगाव शिवारात एका हॉटेलच्या मागे हातभट्टी अड्डा सुरू होता.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत दत्तु सुब्राव शिंदे (वय ७०), बाप्पा दत्तु शिंदे (वय-३६) आणि सर्जेराव दत्तु शिंदे (वय-२६) सर्व रा.जामगाव (आ.), ता. बार्शी यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद पो.कॉ. प्रल्हाद आकुलवार यांनी दिली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








