प्रतिनिधी / बार्शी
आज बार्शी शहरात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी रामकृष्ण एक्झिक्युटिव या हॉटेलमध्ये असणाऱ्या बजाज फायनान्सच्या कार्यालयावर हल्ला करत ऑफिसची मोडतोड केली. बजाज फायनान्सकडून वसुलीसाठी देण्यात येणाऱ्या त्रासाबद्दल मोर्चा काढला होता तसेच निवेदन देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथील कर्मचार्यांनी या महिलांशी बेजबाबदार वर्तन होत असल्याने शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी चिडून व उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी बजाज फायनान्स ऑफिस वर दगडफेक केली तसेच दर्शनी भागाचा असणारे बोर्ड आणि काच यावर दगड मारून नुकसान केले. याबाबत बातमी पाठवे पर्यंत बार्शी पोलीस ठाण्यांमध्ये कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. हे आंदोलन येथील शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर व त्यांचे सहकारी राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आले या दगडफेकीत वेळी शिवसेनेच्या महिला कार्यकर्ता पुरुष कार्यकर्ते भाऊसाहेब आंधळकर आणि त्यांचे सहकारी राजेंद्र गायकवाड उपस्थित होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की बार्शी शहरातील एक महिलेला बजाज फायनान्सच्या वसुली अधिकाऱ्यामार्फत त्या महिलेच्या घरी जाऊन त्रास देण्याचा प्रकार घडला होता. त्याचबरोबर त्या महिलेने आपल्या मोबाईलचा हप्ता भरण्यासाठी पैसे नसल्याने तिने आपले मंगळसूत्र गहाण ठेवले होते हि माहिती शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांना कळताच त्यांनी याबाबत बजाज फायनान्स या खाजगी फायनान्स कंपनीकडे याबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला. यावेळी या घडलेल्या प्रकाराबाबत शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी दैनिक तरुण भारत संवाद शी बोलताना सांगितले की शासनाने आणि आरबीआयने दिलेल्या निर्देशानुसार नोव्हेंबर महिन्यापर्यंत कर्जवसुली थांबवावी असे आदेश असताना काही खासगी कंपन्या फायनान्स, बँक, पतसंस्था, मल्टीस्टेट अशा संस्थांकडून कर्जवसुली साठी तगादा लावण्याचे प्रयत्न होत आहेत तर काही वित्तीय संस्थांनी गाव गुंडा मार्फत सक्तीची वसुली चालू केली असून लोकांच्या गाड्या ओढून नेणे लोकांच्या घरी जाऊन अपमानास्पद वागणूक देणे असे प्रकार चालू आहेत असे प्रकार आता बार्शी शिवसेना खपून घेणार नाही शिवसेना स्टाईलने प्रत्येक वित्तीय संस्थेला उत्तर मिळेल तेव्हा कर्जवसुली तत्काळ थांबवावी कारण लॉकडाऊनमुळे लोकांना रोजगार नाही व्यापारी अडचणीत आहेत रिक्षावाल्यांचे धंदे नाहीत अशा काळामध्ये जर वसुली झाली तर तसे उत्तर दिले जाईल असे सांगताना पुढे म्हणाले की बार्शी शहरात तालुक्यात काही खाजगी सावकार अव्वाच्या सव्वा दराने वसुली करत असल्याच्या तक्रारी शिवसेनेकडे प्राप्त होत आहेत तरी जर कोणत्या सावकाराने वसुलीसाठी तगादा लावला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा भाऊसाहेब आंधळकर यांनी दिला.









