बार्शी/प्रतिनिधी
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी घेण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमध्ये बार्शीतील प्रत्येक व्यापारी आणि विविध आस्थापना मालक यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश तहसीलदार कुंभार यांनी दिले होते. याची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू असून बार्शी नगरपालिकेने आता सर्व व्यापाऱ्यांची कोरोना अँटिजेंन टेस्ट घेण्यासाठी कंबर कसली आहे.
बार्शीतील प्रत्येक व्यापाऱ्याची आणि आस्थापना मालकाची कोरोणा अँटिजेंन टेस्ट व्हावी यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे आता बार्शी नगरपालिकेने या व्यापाऱ्यांना थेट दवाखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी गाडीची व्यवस्था केली असून त्याबरोबर एक पथक नेमले आहे. हे पथक कोणताही व्यापारी किंवा अस्थापना मालक या टेस्ट पासून वंचित राहू नये याची विशेष काळजी हे पथक घेत आहे.
कोरोना चाचणी करण्यासाठी गाडेगाव रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह या ठिकाणी जावे लागत आहे. आणि हे वसतिगृह बार्शी शहर पासून दूर असल्याने त्या ठिकाणी जाण्यासाठी बार्शी नगर परोषदेच्या मिळकत विभागाच्या वतीने मोफत वाहन व्यवस्था पुरवली आहे. आज सकाळ पासूनच या पथकातील कर्मचारी व्यापारी यांना घेऊन जातात आणि टेस्ट करून वापस आणून सोडतात. यासाठी या पथकातील बार्शी पालिकेचे प्रशासन अधिकारी शिवाजी कांबळे, मिळकत विभाग प्रमुख महादेव बोकेफोडे, संतोष कांबळे, बाळासाहेब गुंड, रोहन कांबळे, स्वछता विभागचे ओहोळ, बसवंत आदी अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील आहेत.









