बार्शी / प्रतिनिधी
बार्शी तालुक्यात रेशनच्या धान्याचा काळा बाजार झाल्याने बार्शी तालुक्याचे नाव सबंध राज्यभर गाजत आहे. आतापर्यंत महसूल आणि पोलिस यांनी कारवाई करून हजारो टन रेशनचे काळ्याबाजारात जाणारे धान्य जप्त केले आहे. तसेच संबंधित लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. बार्शीतील खूप मोठे आणि बडे प्रस्थ असणारे व्यापारी या रेशनच्या धान्याचा काळ्याबाजारात सामील असल्याची शंका बार्शी पोलिसांना वाटत असल्याने त्यांनी बार्शीतील अनेक व्यापाऱ्यांच्या गोडावून वरती आणि दुकानावरती धाडी टाकून अनेक ठिकाणी रेशनचा धान्य जप्त केले आहे. याबाबत प्रशासन पातळीवर चौकशीची चक्रे खूप वेगाने फिरत असून आता बार्शी शहर आणि तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार यांची तपासणी होणार आहे.
बार्शी तील सर्व रेशन दुकानदार यांना गेली चार महिन्यांमध्ये विविध योजनांच्या मार्फत आलेला गहू आणि तांदूळ यांचे वाटप कशा पद्धतीने केले याची सविस्तर माहिती मागवली आहे. आता आज बार्शी तहसील कार्यालयाने सर्व रेशन दुकाने तपासणीचे आदेश जारी केले आहेत. यात मंडळ अधिकारी यांनी आपल्या मंडळ कार्यक्षेत्रात असणारी सर्व दुकाने तलाठी यांना सोबत घेऊन तपासणी करायचे करण्याचे आदेश पारित केले आहेत. या तपासणीमध्ये रेशन दुकानदाराने गोडावून मार्फत दुकानात आणलेले धान्य, वाटप केलेले धान्य याची सविस्तर तपासणी होणार आहे. त्याच बरोबर ग्राहकांना पावत्या दिल्या आहेत की नाहीत हे तपासले जाणार असून पावती प्रमाणे माल दिला आहे का हे ही तपासले जाणार आहे. जर दुकानदाराने साठा केला असेल तर त्याची तपासणी होणार असून प्रत्येक रेशन कार्ड नुसार माल वाटप झाला की नाही याचीही तपासणी होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








