प्रतिनिधी / बार्शी
कोरोना काळात रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन पांगरी पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी समाजाशी रक्ताचे नाते जोडण्याचे काम करत भगवंत ब्लड बँकेच्या माध्यमातून केले आहे. असे गौरवोद्गार उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिद्धेश्वर भोरे यांनी काढले ते पांगरी पोलीस स्टेशन, पोलीस पाटील संघटना, पत्रकार संघ यांच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पांगरी पोलिस स्टेशनचे सह पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल, उपनिरीक्षक प्रवीण सिरसाट आदी उपस्थित होते या शिबिरात 121 रक्तदात्यांनी रक्तदान केले,यावेळी बोलताना डॉ. भोरे यांनी गणेशोत्सव काळात रक्तदानाचे आवाहन केल्यानंतर युवा कार्यकर्त्यांनी या शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी भगवंत ब्लड बँकेची सामाजिक बांधिलकीची ओळखली भगवंत ब्लड बँकेने यापूर्वी 26 नोव्हेंबर 2011 रोजी मुंबईत वीरमरण पत्करलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्याचे काम अतिशय चांगल्या प्रकारे केले या रक्तपेढी ने बार्शी तालुक्यात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यकतेनुसार मोफत रक्त देण्याचा संकल्प केला आणि तो प्रत्यक्षात आणला त्यामुळे या रक्तपेढीची पोलीस खात्याबद्दल सकारात्मक भूमिका आहे हे लक्षात घेऊन पोलिस कर्मचाऱ्यांनी या शिबिर नियोजनात उस्फुर्त सहभाग घेतला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक तोरडमल पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिरसट यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग मुंडे कुणाल पाटील तानाजी डोके अर्जुन कापसे संदीप कवडे या पोलीस कर्मचाऱ्यासह भगवंत ब्लड बँकेचे गणेश जगदाळे आदींनी विषेश परिश्रम घेतले.
पांगरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी मागण्यासाठी आलेल्या सर्व गणेश मंडळांना यावेळी पांगरी पोलिस उपनिरीक्षक तोरडमल यांनी या रक्तदान शिबिरास आमंत्रित केले कोणत्याही प्रकारे गर्दी करून गणेशोत्सव साजरा न करता रक्तदान करून बार्शीतील रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी प्रयत्न करू या त्यांच्या आवाहनाला पांगरी तील विविध गणेश मंडळांनी सुद्धा रक्तदान केले
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









