प्रतिनिधी / बार्शी
बार्शीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोज वाढताना दिसत असताना आता फ्रन्टलाइन ला काम करणारे कर्मचारी सुद्धा या विषाणूने बाधित होत आहे. बार्शी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक पदावरील कर्मचारी कोरोना विषाणू बाधित झाला असून त्या कर्मचाऱ्याच्या पत्नीचाही कोरोना अहवाल पॉझिटिव आला आहे एकूणच सर्व बार्शीकर यांच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी बार्शी पोलीस दिवस-रात्र मेहनत घेत आहेत आता पोलिस कर्मचारीच कोरोना बाधित झाल्यामुळे पोलिसांमध्ये सुद्धा काही प्रमाणात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधीही अनेक पोलिस कर्मचारी व अधिकारी कोरोना विषाणूने बाधित झाले होते. मात्र ते उपचार आणखी बरे झाले आहेत, परंतु आताचा विषाणू हा डबल प्रभावी असल्याचे सांगण्यात येत असल्याने कोरोना पासून पोलिसांना काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.
बार्शी सध्या दहा दिवसाचा कडकडून चालू असल्याने पोलिसावर ची जबाबदारी अधिक वाढली आहे. बार्शी शहरांमध्ये दिवस-रात्र चौका चौकात थांबून बार्शी पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पोलिसांना होऊ नये यासाठी मात्र केल्या जाणाऱ्या उपाययोजना खूप तोडके आहेत. बार्शी पोलिसांना शासनामार्फत कोणतेही सबळ अशी मदत , उपाय योजना जसे की मास्क, सॅनिटायजर किंवा इतर तत्सम मदत मिळत नाही. बार्शी पोलिसांच्या काही कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, कोणत्याही मदतीची किंवा उपाययोजनांची अपेक्षा न करता सर्व पोलीस आपल्या कर्तव्य बजावणे मध्ये आघाडीवर आहेत आणि नागरिकांसाठी जीव गेला तरी बेहत्तर परंतु आम्ही कर्तव्य बजावणार अशीसुद्धा भूमिका काही कर्मचाऱ्यांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केली. मात्र या कर्मचाऱ्यांनी एक अडचण मांडली की, दिवसभर ड्युटी केल्यानंतर रात्रीच्या वेळी जी हजेरी घेण्यात येते त्या हजेरी वेळी 50 ते 80 पोलीस एकाच वेळी हजर असतात आणि जागा अपुरी असल्याने खूप दाटीवाटीने त्याठिकाणी हजर होते.
ही हजरी प्रत्यक्ष घेण्याऐवजी जर ऑनलाईन पद्धतीने घेतली तर इतर पोलिसांपासून होणारा कोरोना संसर्ग नक्कीच कोरोना संसर्ग कमी होऊ शकतो. तेव्हा बार्शी शहर पोलीस ठाणे या ठिकाणी होणारी हजरी जर सुरक्षित पद्धतीने किंवा ऑनलाइन पद्धतीने घेतली तर पोलिसांपासून पोलिसांना होणारा संसर्ग नक्कीच कमी होणार आहे याबाबत बार्शी शहर पोलीस निरीक्षक , पोलीस उपअधीक्षक व सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.