प्रतिनिधी / बार्शी
बार्शी तालुक्यातील काटेगाव गावाजवळ हॉटेल रानवारा नजीक दिनांक 8 ऑक्टोबरच्या पहाटे चोरट्यांनी बार्शी तालुका पोलिस स्टेशनचे हवालदार बेदरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांना गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत जखमी पोलीस कॉन्स्टेबल बेदरे यांनी खबर बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे दिल्यानंतर चोरट्यांवर ती गुन्हा दाखल केला असून आपल्या दैनंदिन अहवालात तशी नोंदही केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक आठ ऑगस्ट गुरुवारच्या पहाटे चार वाजणेच्या सुमारास बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल बेदरे व त्यांचे सहकारी कर्मचारी हे मौजे चुंब या गावांमध्ये पेट्रोलिंग करत असताना एक मोटारसायकल भरधाव वेगाने एक असल्याचे दिसली. पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांनी ही मोटरसायकल थांबवण्याचा प्रयत्न केला असता मोटारसायकल पुढे वेगात निघून गेली, पोलिसांनी त्या मोटरसायकलचा पाठपुरावा केला असता काटेगाव गावाजवळ हॉटेल रानवाराच्या जवळ ती मोटारसायकल थांबवली तेव्हा त्या मोटारसायकलवरून आलेले आरोपी सडकेल भोसले उर्फ शिवा गंगाराम भोसले याने मोटार सायकलवरून उतरून अचानक पोलीस कॉन्स्टेबल बेदरे यांच्या डाव्या हाताच्या करंगळीला सुरा मारून जखमी केले.
तसेच त्यांच्या डाव्या अंगठ्याजवळ चावा घेतला व पोलीस कॉन्स्टेबल बेदरे यांना खाली पाडून त्यांच्या छातीवर दगडाने मारा केला यावेळी झालेल्या झटापटीत आरोपी भोसले यांच्या सोबत असणारे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले यावेळी पोलिसांनी भोसले यांची झडती घेतली असता त्याच्या जवळ जबरी चोरी करण्यासाठी दोन सुरे ,एक खात्री, एक पोपट पाना , 3 ब्लेड , बॅटरी व इतर चोरलेले साहित्य सापडले. या घटनेची खबर पोलीस कॉन्स्टेबल बेदरे यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दिली असून फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल मंडलिक यांनी दिली आहे यात आरोपी भोसले व इतर पळून गेलेले आरोपी यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान 398, 353, 332,333 कलम , शस्त्र अधिनियम कायदा कलम 4,25, महा पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









