वैराग येथील ६८ वर्षीच इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू
बार्शी / प्रतिनिधी
वैराग ता. बार्शी येथील ६८ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह इसमाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दि. ६ जून पासून बार्शीतील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते. दरम्यान त्याची तपासणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष जोगदंड यांनी दिली आहे.
कोरोनाच्या बाबतीत तब्बलअडीच महिने निरंक असलेल्या बार्शीचा आकडा आज ३२ वर पोहचला आहे. यामध्ये यामध्ये १९ पुरुष तर १३ स्त्रियांचा समावेश आहे सध्या एकूण बारा पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये बार्शीतील कोविड सेंटर मध्ये दहा, पुण्यातील हॉस्पिटलमध्ये एक आणि बार्शीतील खाजगी हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण उपचार घेत आहे सध्या १०५३ लोकांना होम क्वारंटाईन तर २१७ जणांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. आज बार्शीतून१७ तर वैराग मधून सात असे एकूण २४ स्वॅबघेण्यात आले आहेत तर आता बार्शीकरांना ३४ अहवालाची प्रतीक्षा आहे.
वाढत्या रुग्ण संख्यामुळे जोखीम वाढली
सध्या बार्शीतील कोरोनाच्या वाढत्या रूग्ण संख्यामुळे आता सर्वांची जोखीम वाढली असून आता प्रत्येकाने आरोग्य विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे तरच या महामारी कोरोनावर मात करता येईल तरी अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.