तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून करोना रुग्णांवर बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार केले जात असल्याची माहिती महात्मा फुले योजनेच्या आरोग्य समन्वयकांनी दिली आहे.
अधिक माहिती अशी की, सध्या करोना सर्वत्र हाहाकार निर्माण केला आहे तब्बल ८० दिवस निरक असलेल्या बार्शी तालुक्यात जवळपास चाळीस हुन अधिक रुग्णांची संख्या वाढली आहे काही जणांचा मृत्यू झाला आहे अशा परिस्थितीत रुग्ण आणि नातेवाईकांना करोना च्या उपचाराबाबतीत योग्य ती माहिती मिळावी यासाठी आम्ही महात्मा फुले योजनेच्या आरोग्य मित्रांशी संपर्क साधला असता त्यांनी वरील माहिती दिली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बार्शीतील जगदाळे मामा या नामांकित हॉस्पिटलने सामाजिक बांधिलकी जपत कोविड च्या रुग्णांना मोफत उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे कोविड या महामारी आजारावर मोफत उपचार करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एकूण आठ हॉस्पिटल चा समावेश आहे यामध्ये बार्शीतील जगदाळेमामा हॉस्पिटल चा समावेश करण्यात आला आहे शासनाच्या योजनेतून कोविड ची लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार केले जातात यासाठी रेशन कार्ड व आधार कार्ड या दोन्ही कागदपत्रांची आवश्यकता आहे मात्र काही कारणास्तव ही कागदपत्रे तात्काळ उपलब्ध झाली नाहीत तरीही दूरध्वनीवरून उपचारासाठी मान्यता घेण्याची सोय शासनाकडून करण्यात आली आहे यासाठी हॉस्पिटलमध्ये हजर असणारे आरोग्य मित्र यासाठी रुग्ण व नातेवाईकांना मदत करतील याबाबतीत कोणतीही अडचण आली तर शासनाच्या टोल फ्री नंबरवर किंवा जिल्हा शल्यचिकित्सक यांचेशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पांढऱ्या रेशन कार्ड लाही मिळणार योजनेचा लाभ
महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील अडीचशे पेक्षा अधिक कोविड रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत तरी जास्तीत जास्त गरजूंनी याचा लाभ घ्यावा तसेच आता पांढरे रेशनकार्ड असणारे नागरिकांनाही या योजनेतून लाभ घेता येणार असल्याची माहिती या योजनेचे पुणे विभागीय समन्वयक डॉक्टर निखिल मस्के व जिल्हा समन्वयक डॉ दीपक वाघमारे यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









