प्रतिनिधी/ म्हापसा
बार्देश तालुका भंडारी समाजाच्या अध्यक्षपदी हणजूण येथील नारायण लाडू मांद्रेकर यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. केंद्रीय भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी ही समिती जाहीर केली.
म्हापसा येथे बार्देश तालुक्याची समिती निवडण्यासाठी भंडारी समाजाच्या सभागृहात महिन्यापूर्वी खास बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत समाजाच्या अध्यक्ष निवडीवरून तणाव निर्माण झाला होता. बार्देश तालुका समितीचे माजी अध्यक्ष सुधीर कांदोळकर यांनी यावेळी आपल्या कारकीर्दीतील हिशोब सादर केला असता हिशोबावरून वातावरण तंग झाले होते. आरोप प्रत्यारोपाने ही बैठक बरीच गाजली होती. त्यानंतर केंद्रीय समितीचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी नवीन समिती निवडण्याबाबत इच्छुक नागरिकांची नावे घेऊन ही बैठक संपवली होती. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी प्रभाकर मांद्रेकर, किशोर अस्नोडकर, नारायण मांद्रेकर यांची नावे पुढे आली असता माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांचे निकटवर्तीय नारायण मांद्रेकर यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्त करण्यात आले.
यावेळी निवडण्यात आलेली इतर समिती पुढीलप्रमाणेः उपाध्यक्ष- अनिल पेडणेकर (पर्वरी), जयदेव रामा शिरोडकर (शापोरा-हणजूण), सनी पांडुरंग नानोडकर (गिरी), नरेंद्र आजगावकर (नास्नोळा), तारक आरोलकर (म्हापसा), प्रभाकर मांद्रेकर (काणका), गुरुदास वायंगणकर (म्हापसा), गोविंद गोवेकर (हळदोणा), संदीप कौठणकर (थिवी), शिवानंद बाणावलीकर (अस्नोडा), बाबली मांद्रेकर (हडफडे), सचिव- विश्वास राया नाईक (म्हापसा), खजिनदार- चारुदत्त पणजीकर (खोर्जुवे), सहसचिव रोहिदास, जोकी मालवणकर (वागातोर), सुरेंद्र साजू गोवेकर (शापोरा), सिद्धार्थ मडगावकर (हळदोणा), रुपेश कवळेकर (अस्नोडा), संजय होबळे कळंगुटकर(नेरूल), दिगंबर आगारवाडेकर (शिवोली), श्याम रामदास गोवेकर (बादे-आसगाव), सागर लिंगुडकर (काणका), सुदेश किनळेकर(काणका), संजय हरी पर्वतकर (पर्वरी). सहखजिनदार- निलेश ज्ञानेश्वर कांबळी(शिरसई), विश्वजीत नाईक बाणावलीकर(नेरूल), बाळा नाईक (काणका), संदीप बांदोडकर (पिळर्ण), रामकृष्ण केरकर (कांदोळी), दामोदर शिरोडकर (पोंबुर्फा, चेतन कारापुरकर (कळंगूट).
कार्यकारी सदस्य- सुभाष कळंगुटकर(बेती), दत्ता तुकाराम ताम्हणकर (शापोरा), विनय चोपडेकर (पोंबुर्फा), पांडुरंग शिरोडकर (शापोरा), अंतिम ताम्हणकर(शापोरा), वासुदेव शिरोडकर (शापोरा), शाबली सातार्डेकर (शापोरा), अरुण आसोलकर (म्हापसा), महेश शिरगावकर (म्हापसा), प्रेमानंद कोचरेकर (सांगोल्डा), बाबाजी गडेकर (गिरी), दिगंबर वायंगणकर (नास्नोळा), सदाशिव आगारवाडेकर (ओशेल), मोहन दाभाळे (काणका), देवानंद पेडणेकर (सडये), हनुमंत गोवेकर (हणजूण), चंद्रशेखर नाईक (नास्नोळा), यशवंत कांदोळकर (कळंगूट). नवनिर्वाचित अध्यक्ष नारायण मांद्रेकर यांनी आपल्या निवडीबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करीत आपल्या निवडीसाठी अहोरात्र झटणारे माजी मंत्री दयानंद मांद्रेकर तसेच केंद्रीय समितीचे अध्यक्ष अशोक नाईक तसेच समितीच्या सर्व पदाधिकऱयांचे तसेच आमदार जयेश साळगावकर यांचे आभार व्यक्त करीत समाजाच्या कार्य पुढे नेण्यासाठी आपण सदैव तत्पर असेन असे यावेळी सांगितले.









