प्रतिनिधी / इस्लामपूर
वाळवा येथील सराफ व्यावसायिक सुमित्रा प्रतापसिंह भोसले यांची दोन कारागिरांनी नविन दागिने करुन देतो असे सांगून १२ तोळे सोन्या सह रोख १५ लाख ६०० रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली.अमोल रोहिदास वडगावे(रा.आरग, ता.मिरज) व श्रीकांत तवन्नपा कांते (रा.हुपरी, ता.हातकणंगले)अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
भोसले यांचे दोन वर्षापूर्वी सांगली सराफ कट्टा येथे सोन्या-चांदीचे दुकान होते. सध्या वाळवा येथे रहाते घरी लहान दुकान आहे.सांगली येथे दुकान असताना वडगावे व कांते यांचे दुकानात येणे-जाणे होते. त्यातून ओळख झाली.त्यापूर्वी ही त्यांच्याकडून सोन्या-चांदीच्या वस्तू घेतल्या होत्या. त्यांनतर व्यवसाय वाढवण्यासाठी इस्लामपूर ते वाळवा रस्त्यावरील गट क्र.५३६/१ मधील शेती विकली. दरम्यान श्रीकांत याने सुमित्रा भोसले यांना फोन करुन स्वस्तात दागिने तयार करुन देण्याचे आमिष दाखवले.
दोघे वाळवा येथे आले. त्यांनी पैसे व सोन्याची मागणी केली.त्यानंतर नंदकुमार बी.पाटील यांच्याकडे नोटरी करुन मोडीस आलेले बारा तोळे सोने नवीन बनवण्यासाठी व रोख १५,६०० रुपये रोख त्यांना दिले. नोटरीची मुदत संपल्यावर त्यांना भोसले यांनी विचारणा केली.त्यावेळी ते काम चालू असल्याचे सांगत होते.पण कालांतराने त्यांनी फोन बंद ठेवले. वडगावे व कांते यांनी फसवणूक केल्याप्रकरणी भोसले यांनी गुरुवारी पोलीस ठाण्यात वर्दी दिली.








